आयतालेख Histograms व वारंवारता वक्र frequency curve हा अतीशय सोपा भाग आसातांनाही विद्यार्थी बोर्डाचे पेपर मध्ये अनेक चुका कृरतांना मी बघीतले आहे. त्यात नेमक्या उल्लेखनीय बाबी कोणत्या? तर.... 1) स्केल ः- योग्य स्केल घेतांना विद्यार्थी चुकतात 2) स्तंभ ः- स्तंभ काढतांना स्केल अचुक नसल्याने व आयतालेख व स्तंभालेख यातील फरक न समजल्याने विद्यार्थी चुका करतात 3) वारःवारता वक्रः- नेमका वारंवारता वक्र म्हणजे काय? याबाबत विद्यार्थी संभ्रमावस्थेत असतात.
या सर्व बाबी आतीशय सहजपणे, बारकाव्यानीशी विद्यार्थी या अध्यापन साहित्याद्वारे अगदी खेळीमेळीने शिकतात हे अनुभवले आहे.
Monday, 24 October 2016
माझे अध्यापन साहित्य १. आयतालेख व वारंवारता बहुभूज
Sunday, 9 October 2016
शिक्षक व शिक्षण
*शिक्षक दिन की दीन शिक्षक ??* --------------- *विनोद पिसे*
आज शिक्षक दिन त्या निमित्यानाने सर्व शिक्षक बंधुना हार्दिक शुभेच्या !!
आज डाक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिन, त्यांना राष्ट्रपती पदावर विराजमान करून त्या काळात एका शिक्षकाला सविधानातील परमोच्च स्थान समाजाने बहाल केले. त्या काळात शिक्षकांचे स्थान व आजच्या या तंत्रध्यानाच्या युगात शिक्षकांची स्थान यात बराच बदल झालेला आपल्या लक्षात येईल.
आज संगणक युगातही शिक्षकांचे महत्व अबाधित आहे. विद्यार्थ्यान्ना ध्यान मिळविण्यासाठी अनेक पर्याय या आधुनिक युगात उपलब्ध आहेत. परंतु ते ध्यान कसे मिळवायचे याचेही ध्यान शिक्षकांशिवाय येणे कठीण आहे.
गत काळातील शिक्षक व शिक्षण :- प्राचीन काळात शिक्षकी पेशा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जायचा शिक्षक ऐवजी गुरु हे स्थान व नाव किंवा उपाधी दिली जायची , गुरुची अध्या हि सर्वाना मग राजा असो वा रंक सर्वोतोपरी असायची. त्याच्या उदरभरण वा चरीतार्ताची संपूर्ण जवाबदारी हि समाजाची असायची. विद्यार्थ्यांना शिक्षण हे त्या-त्या काळात गरजेनुसार असायचे राजकुमाराला राज्य चालवाचे, क्षत्रीयांना राज्याचे संरक्षनाबाबत, इतरांना त्यांच्या व्यवसायाशी निगडीत शिक्षण दिले जायचे. एकंदरीत आजच्या शब्दात “कौशल्य” शिक्षण असायचे. गुरुकुल पद्धत अवलंबिली जायची,तेव्हा मात्र गुरुदेवो महेश्वरा वैगेरे... वैगेरे गुरूला भूषविले जायचे, *पण त्याकाळात फक्त विशिष्ट जाती धर्मांच्या लोकांना या पेशात जाण्यास परवानगी होती*.त्यानंतरचा काळ ब्रिटीश राजवटी मध्ये शिक्षण प्रणाली बदलली, कारकून तयार करण्या करिता *हातगडी* किवा सांगकाम्या तयार व्हावे यासाठी म्हणून शिक्षण सुरु झाले.परंतु तेही सहजासहजी समाजातील सर्व घटकांना घ्यायची परवानगी नव्हती. पेशवाई व अस्पृशता यामुळे महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांना यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला तेव्हाच तळागाळातील समाजाच्या लोकांना शिक्षण बघायला मिळाले, याला इतिहास साक्षी आहे. स्वतंत्र पूर्व काळातील शिक्षणाच्या बाबतीत फार तळाशी जाने याठिकाणी उचित होणार नाही. सांगण्याचे तात्पर्य हे कि त्याकाळात शिक्षण मिळविणे हे डाक्टर बाबासाहेबांनी संगीतल्या प्रमाणे *वाघिणीचे दुध पिणे* यासारखेच होते. व त्याकाळात शिक्षणासाठी शिक्षकांना विध्यार्थ्या पर्यंत जाण्याची गरज नव्हती. तेव्हाही शिक्षकांचे स्थान हे उच्च होते. एकंदरीत केवळ मागील चार-पांच दशकापूर्वी व त्यापूर्वीचा काळ हा खरोखर *गुरु ब्रम्हा,गुरु विष्णू, गुरुर देवो महेश्वरा * प्रमाणे होती. आवर्जून सांगावे ते हे कि याही काळात शिक्षक पदावर उच्च वर्णातील लोकांचे वर्चस्व होते.
आधुनिक काळातील शिक्षक व शिक्षण :- आधुनिक काळात शिक्षणाची व्याप्ती वाढत गेली. आता मात्र शिक्षण सर्वांसाठी खुले झाले.शिक्षक पदाकरिता मोठ्या संखेने बहुजन, दलित, शोषित वर्गाचे लोक यायला लागले. हि किमया डाक्टर बाबासाहेबांच्या संविधान लेखणीचीच..., शिक्षणाची क्षितिजे आता विस्तारू लागली. नवनवी शाखा, नवनवे क्षेत्रात प्रचंड प्रगती त्यामुळे त्या – त्या प्रकारचे शिक्षण देणे गरजेचे झाले. शिक्षण घेण्या करिता शिक्षक हा फक्त मार्गदर्शक म्हणून आता भूमिका बाजू लागला. तसतसे शिक्षकांचे महत्व या देशात कमी-कमी होऊ लागले. गावो-गावी, खेडो-पाडी माध्यमिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाली.कर्मविर भाउराव पाटील , देशमुख , दादासाहेब कन्नमवारसारखे शिक्षण महर्षी यांनी एक प्रकारची शैक्षणिक क्रांती महाराष्ट्रात आणली. तेव्हापासून, दलित ,शोषित, पिडीत, बहुजांची मुले शिक्षकी पेशात मोठ्या संखेने येऊ लागली, व शिक्षण घेणाऱ्या या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली. येथूनच एका विशिष्ट वर्गाची शिक्षकी पेशाची मत्तेदारी किमान पक्षी प्रार्थमिक-माध्यमिक स्तरावर संपुष्टात आली. आणि येथूनच शिक्षक,व शिक्षणा बाबत पोटदुखी सुरु झाली.
*शिक्षकांची आजची परस्थिती*:- स्वतंत्रोतर काळात माद्यामिक शिक्षणात अनेक प्रकार आले, अनुदानित ते विनानुदानित, विनानुदानित ते कायम विनानुदानित, आता स्वयं अर्थ साहाय्य शाळांना पेव फुटले आहे, इंग्लिश माध्यमांचा बाजार अलीकडे सर्रास मांडलेला दिसतो आहे. शिक्षक विध्यार्थ्यासाठी दरोदार भटकंती करताना दिसतो आहे. शिक्षकांची वेतनाबाबत टर उडविली जात आहे. सर्वात आळशी व बेजवाबदार म्हणून हिणवले जात आहे. ऐतखाऊ, फुकटचा पगार घेणारे, देशात सर्वात बिन कामाचे म्हणून संबोधले जात आहे.
शिक्षण क्षेत्रात कधी नव्हे एवढी भानगडी या ठिकाणी शासनाने गेल्या दोन-तिन दशकात आणायला सुरवात केली. सर्वात पहिल्यांदा शिक्षण क्षेत्रात वेठबिगारी आण ण्यासाठी कायम विनानुदानित पासून स्वयं अर्थसाहाय्यीत वैगेरे प्रकार आणून शासन आपली शिक्षनाची जवाबदारी झटकू पाहू लागले. शाळा या शिक्षण संस्था कमी व शासनाच्या योजना राबविणाऱ्या प्रयोगशाळा झाल्यात. कुपोषण,लसीकरण, लैंगिक शिक्षण, मतदार जागृती, मतदार र्नोंदनी, जनगणना, कुटुंबनियोजन, पशु गणना, गरोदर माता गणना, वैगेरे प्रकार ज्याचा संबंध दुरान्वये शिक्षणाशी नाही अश्या बाबी शिक्षण शेत्रात प्रचंड वेगाने जबरदस्ती घालण्यात आल्या.त्यामुळे शिक्षक व शाळा मुळ शिक्षणाची कामे सोडून खर्डे घाशिपणा याकडे वळली.
आमचा शिक्षक व आमची शाळा समाजाच्या दृष्टीने टर उडविण्याचे साधन व्हायला सुरवात याच ठिकाणी झाली. प्रामुख्याने नमूद करायचे ते हे कि आमचा बहुजन समाज उच्चवर्नियांची मत्तेदारी तोडून कधी नव्हे तो या शेत्रात बहुसंखेने आला. व आपल्या समाज बांधवांना व विद्यार्थाना मोठ्मोठ्या पदावर आरूढ होण्याचे, पुण्य मिळवू लागला. मोठ्या पदावरील जाती व्यवस्थेला पायाखालची वाळू सरकायला लागली.
*शासनाचे शिक्षण क्षेत्राकडे पाहणाचा दृष्टीकोन* :- जागीतीकरणामुळे शासकीय यंत्रणा शिक्षण क्षेत्राकडे व्यावसाईक दृष्ट्रीने पाहू लागली. निरुत्पादक क्षेत्र म्हणून व्यापारी दृष्टीने नफा-तोटा बघू लागले.शिक्षण शेत्रावरील खर्च हि खर्च नसून भांडवल आहे हे समजूनही नाकारू लागले. त्यामुळेच या शेत्रावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करून खाजगी शिक्षण संस्थां ची अधिकार कमी करण्या साठी शालाव्याव्स्थापन,व्यवस्थापन व विकास समिती, याप्रकारच्या माता-पालक, पालक-शिक्षक............ एक नवे तर आज १४-१५ प्रकारच्या समित्या शाळांना गठीत करण्याची व त्यांच्या नियमित सभा घेण्याचे फर्मान शाळा मुख्याध्यापकांना सोडले आहे. यामुळे महिन्या काठी या सर्व समित्याची सभा घ्याची म्हटली तरी किमान २०-२२ कार्यादिवसं पैकी १५-१६ दिवस नुसते सभा घेण्यात जाणार, शालेय व्यवस्थापन, प्रशसकीय बाबी, व वर्ग अध्यापन विषयी बाबीबद्दल वेळच कोठे असणार?
त्यातल्या त्यात अनुदानित शाळांना विद्यार्थी मिळेनासे झाले. व शासन canvent नावाची वेठबिगार शिक्षकांची शाळा दारोदारी उघडू पाहत आहे, ही अवस्था एवढी दयनीय आहे कि शिक्षकांचे अस्तित्व , व शाळांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. बहुजन समाजाच्या शिक्षणाकरीता जी क्रांती अनेक वर्ष आमच्या शाहु, फुले,आंबेडकर,भाउराव पाटिला ,अश्या अनेक नेत्यांनी केली. त्याला सुरूंग लागुन अज्ञानाच्या विळख्यात आमच्या अनेक पिढ्यांनी काढले, तीच परीस्थीती पैश्याने विकत घेण्याच्या शिक्षणाने आमच्यावर भविष्यात पुढे येण्याची शक्यता आहे.त्यामुळेच आनुदानित शाळा व शिक्षण यांचे मध्ये मोठ्या प्रमाणात धुडघुस चालली आहे. हे वेळीच ओळखणे व त्यासाठी संघटीत होउन संघर्ष करण्याची जवाबदारी, व ती वेळ आज या दिवसाच्या निमीत्याने आता आली आहे.